शैक्षणिक सेवेसाठी बंसल क्लासेस व क्यूरीयस किड्स नामी संधी : चंदुलालजी बियाणी

बंसल क्लासेस व क्यूरीयस किड्स आयोजित शैक्षणिक गुंतवणूक परिषदेस महाराष्ट्रातील विविध मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर /एम एन सी न्यूज नेटवर्क : राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्सद्वारे शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आयोजित ‘इन्व्हेस्टर्स समीट 2023’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रामध्ये स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या भावी व्यावसायीकांसाठी राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्सद्वारे दि. 27 ऑगस्ट, रविवार रोजी बाफना-निशा प्लाझा येथे ‘’इन्व्हेस्टर्स समीट 2023’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषणात बोलतांना बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक मा. चंदुलालजी बियाणी सर म्हणाले की, विविध क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व नवउद्योजक इतर क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात. परंतू शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी कोणीही उत्सुक नसते. कारण क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध नसतात, असे अनेकांचे मत आहे. बंसल क्लासेस व क्यूरिअस किड्सच्या माध्यमातनू शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची नामी संधी मिळत आहे. या संधीचे भावी व्यावसायीकांनी, उद्योजकांनी सोने करावे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करणे हे समाज सेवा करण्यासारखेच आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनिअर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे दर्जेदार शिक्षण मिळत नाही. त्यामुळे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नामी संधीसोबतच उज्वल भविष्य देऊ शकतो असे मत यावेळी मुख्य प्रवर्तक मा. चंदुलालजी बियाणी सर यांनी मांडले.

या कार्यक्रमाला बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक मा. चंदुलालजी बियाणी सर, उपाध्यक्ष मा.डॉ.रामेश्वर बांगड सर, उपाध्यक्ष मा. कैलास घुगे सर, उपाध्यक्षा मा.पुजा बियाणी मॅडम, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक मा.जगदीशजी बियाणी सर, बंसल क्लासेस महाराष्ट्र स्टेट हेड मा. प्रा. विष्णू घुगे सर, चिफ ॲडमिनिस्ट्रेटर मा. राकेश चांडक सर, व्हाईस स्टेट हेड मा. एस.एस.कादरी सर, व्हाईस स्टेट हेड मा.सत्यजीत हैबते सर, गार्डिअन मॅनेजर मा. सुरेश घुगे सर, सेल्स हेड मा. नामदेव कराड सर, फायनान्स हेड मा. सुरज बियाणी सर, अकाऊंट विभागचे मा. पारस बोरा सर, मा. यश श्रीश्रीमाळ सर, मा. संजय मिर्जी सर, मा. संध्या पांडे मॅडम, बंसल क्लासेस अकोला शाखेचे संचालक मा. गोविंद तोष्णिवाल सर, केज शाखेचे संचालक हारूणभाई इनामदार सर, बजाजनगर शाखेचे संचालक मा.सचिन चव्हाण सर, क्युरीयस किड्सच्या मा. किरण रोडा मॅडम, मा. राम शर्मा सर, मा. तुलसीदास खटके सर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उद्योजक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.