बीड/ परळी वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क:- आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा परळी शहरातील संत जगमित्र नागा मंदिर येथे असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला सकाळी सहा वाजता पाळणा आणि आरती होऊन जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २९ ऑगस्ट २०२३, मंगळवार ,श्रावण शुद्ध १३ रोजी शहरातील संत जनित्र नागा मंदिर येथे जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरातील समस्त स्वकुळ साळी ( विणकर) बांधव येथे पहाटेच आरती साठी समाजातील सर्व लहान थोर मंडळी उपस्थित होते. समाज बांधवांच्या वतीने सकाळी सहाच्या सुमारास जन्मोत्सव, ९ वाजता समाजातील लहान मुला-मुलींसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.दरम्यान समाजातील महावितरण मध्ये रुजू झालेल्या सौ. प्रियंका प्रभू घटे, चैतन्य मानकर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दहावी -बारावी मध्ये उत्कृष्ट गुणसंपादन करणाऱ्या पाल्यांचाही यावेळेस यथोचित गौरव करण्यात आला. समाज बांधव ज्ञानोबा घटे यांनी विविध विभागातील तांत्रिक नोकऱ्या संदर्भात मार्गदर्शन केले.दुपारी चार वाजता जिव्हेश्वर महिला भजनी मंडळीचे भजन हे संपन्न झाले. जन्मोत्सव सोहळ्यास शहरातील अनेक मान्यवरांनी, पत्रकारांनी उपस्थिती लावली आणि आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केलं. सायं.६ वा.आरती होऊन जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली. जन्मोत्सव सोहळ्याचे पौरोहित्य उदय औटी यांनी केलं.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वकुळ साळी विणकर समाजाचे शहराध्यक्ष बालासाहेब पोरे, सचिव नितीन भंडारे, विलास ताटे, धनंजय आरबुने, ज्ञानोबा घटे,नारायण मानकर, नामदेव आरबुने, गंगाधर इंगळे, विष्णू लिखे, अशोक लिखे, नवनाथ पोरे, भगवान आरबुने,श्रीनिवास लटंगे, सुदर्शन वडकर, प्रभू घटे, नवनाथ पोरे,उमेश मानकर, संदीप बोनगे, दौलत आरबुने,लक्ष्मण लिमकर, पवन आरबुने,अशोक आरबुने, दीपक आरबुने, दत्तात्रय बडकस,गणेश पोरे, सचिन पोरे, दीपक मानकर, उमेश मानकर, किसन कांबळे महिला मंडळाच्या स्वाती ताटे, मंजुषा पोरे, सुरेखा आरबुने, वैजयंती इंगळे, अनुराधा कौसाले, श्रीमती सीताबाई भंडारे, रंजना जंत्रे, कल्पना ठोंबरे, अरुणा भंडारे, मंजुषा आरबुने ,मीरा घटे, राणी लटींगे, किरण गालम, सुनंदा मानकर, माया बडकस, पद्मा लटेंगे, आरती अरबूने, अंजली पोरे, सारिका आरबुने, पार्वती इंगळे आदीसह स्वकुळ साळी समाजातील तरुणांनी, युवतीने कष्ट घेतले.
……………………………………………………………………..
◾संपूर्ण देशभरात श्री भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.विशेषतः महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात,मध्य प्रदेश आदी राज्यातही आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र श्री भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा होतो.
………………………………………………….……………………..