राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्सद्वारे कार्यक्रमाचे पुणे येथे आयोजन
पुणे /एम एन सी न्यूज नेटवर्क : राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्सद्वारे आयोजित ‘इन्व्हेस्टर्स समीट-2023’ कार्यक्रमाच्या द्वितीय सत्राचे दि. 3 सप्टेंबर, रविवार रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहणाऱ्या भावी व्यावसायीकांसाठी राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्व्हेस्टर्स समीट-2023’ च्या रूपाने सुवर्ण उपलब्ध करून दिली आहे. ‘नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा!’ या म्हणी प्रमाणे अनेकांना स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. परंतू त्यांना कोणत्या क्षेत्रात व्यवसाय करावा ? यामध्ये संभ्रम असतो. तसेच इतर क्षेत्रांमध्ये व्यवसाय करण्यासाठी खूप जास्त स्पर्धा देखील आहे. त्यामुळे अनेक व्यावसायीक, उद्योजक चांगल्या संधीची वाट पाहत असतात म्हणूनच बंसल क्लासेसचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो डॉक्टर्स व इंजिनिअर्स घडविणाऱ्या राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी, सकाळी 10 ते दु. 4 वाजेपर्यंत हॉटेल द डेक्कन रोयाल-1, जंगली महाराज रोड -573/2, पुणे या ठिकाणी ‘इन्व्हेटर्स समीट-2023’ च्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर इतर शहरातील भावी उद्योजकांना शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ‘इन्व्हेस्टर्स समीट-2023’ या कार्यक्रमामध्ये जास्तीत संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी बंसल क्लासेस व क्यूरियस किड्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये भावी व्यावसायीकांना प्रोत्साहन देणार – चंदुलालजी बियाणी
शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व चांगल्या संधी उपलब्ध नसल्याने आज पर्यंत शिक्षण क्षेत्रात तरूण व्यावसायीक येत नव्हते. परंतू लाखो विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य देणाऱ्या राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्युरियस किड्स मार्फत शिक्षण क्षेत्रात व्यावसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक भावी व्यावसायीकांना पूर्णपणे मदत करणार आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसाय केल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळेल आणि भविष्यातील करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतील म्हणूनच शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसाय करू इच्छिणाऱ्या भावी व्यावसायीकांना प्रोत्साहन देणार असल्याचे यावेळी बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी यांनी सांगितले.
