शेतकऱ्यासाठी महविकास आघाडी(I.N.D.I.A) आक्रमक उपविभागीय कार्यालयावर बुधवार 6 सप्टेंबरला धडक मोर्चा

बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी तालुक्यातील सध्याची परिस्थिती पाहता मागच्या अनेक दिवसापासून पाऊस नाही त्यामुळे 80 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन आधार द्यावा शेतकऱ्यांचा मागील पिक विमा अतिवृष्टीचा अनुदान 100% अग्रीम देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी यांना महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले असून बुधवार 6 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय परळी वै च्या समोर लोकशाही मार्गाने धडक मोर्चा करण्यात येणार आहे.

या आंदोलनातील प्रमुख मागण्या
1) तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा 2) 25% टक्के अग्रीम ऐवजी वगळलेल्या परळी मंडळासह सरसकट 100% टक्के अग्रीम देण्यात देण्यात यावे 3) 2020 चा राहिलेला पूर्ण विमा व 2021/22 चा उर्वरित 75% टक्के विमा तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा. 4) परळी तालुक्यातील सर्व धरण (जलाशय) पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात यावेत5) अतिवृष्टीमुळे 2021/22 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी आलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे.6)परळी शहरातील विजेचा लपंडाव mseb च्या गलथान कारभारामुळे सुरु आहे तो तात्काळ थांबवा .7) परळी वै नगरपरिषदेच्या मागील ५ वर्षाचा थर्ड पार्टी लेखा परीक्षन (विशेष ऑडिट) करून अहवाल जनतेसमोर जाहीर करावा 8) प्रलंबित भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रश्नावर कारवाई करून त्यांचे व्यवस्थापन लावणे.9) मागच्या अनेक वर्षापासून खुर्चीला चिटकून बसलेल्या परळी शहर व तालुका विविध कार्यालयातील कर्मचारी/ अधिकारी यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात 10) खाद्यपदार्थ, पेट्रोल, डिझेल,इंधन, तेल व इतर पदार्थावरील दर तात्काळ कमी करून महागाई कमी करण्यात यावी यांसह इतर मागण्या घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून या धडक मोर्चामध्ये परळी तालुक्यातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर सर्वसामान्य लोक परळी शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले असून या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देवराव लुगडे महाराज शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे काँग्रेस आयचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ (बहादूर भाई) यांच्या सह्या आहेत या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या आंदोलनामधील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.