मल्याळम अभिनेत्री मृतावस्थेत

केरळ/तिरुवनंतपुरम : प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री व टीव्ही कलाकार अपर्णा नायर केरळच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. ३३ वर्षीय अपर्णा गुरुवारी रात्री शहरातील करमान येथील घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. अपर्णा यांच्या पश्चात कुटुंबात पती व दोन मुले आहेत.

अपर्णा नायर पती व दोन मुलांसोबत करमान येथील घरी राहत होत्या. त्यांनी गळफास घेतल्याचे रात्री साडेसात वाजता कुटुंबीयांना समजले. यानंतर उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अपर्णाला मृत घोषित केले.अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.