अंतारवली सराटे येथील उपोषण कर्त्यावरील लाठीमार आणि गोळीबाराचा जिल्हाभरात कडकडीत निषेध

◾ बीड जिल्ह्यातील  बंद यशस्वी
◾ परळी वैजनाथ तहसील इमारतीसमोर मराठा आरक्षणाबाबत ठिय्या आंदोलन सुरू.
◾ वर्ष 2018 मध्ये सुमारे 21 दिवस चाललेले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन या स्थळी झाल होतं

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क:- अंतरवली येथील मराठा आरक्षणा बध्दल उपोषणकर्त्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ सह सर्व तालुक्यात अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, आष्टी, धारूर, शिरूर, गेवराई,
पाटोदा, शहरात कडकडीत बंद पाडून करण्यात आला. बंद च्या आवाहनास प्रतिसाद म्हणून परळी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, विविध शैक्षणिक आणि किराणा भुसार आडते बाजार कडकडीत बंद होता .
जालना जिल्ह्यातील अंतरवली येथील मराठा आरक्षना संदर्भात मागील काही दिवसा पासून उपोषण सुरु होते. शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषण स्थळी उपोषण कर्त्या वर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली होती. याचाच भाग म्हणून परळी येथे ही बंद पाळण्यात आला. अगदी सकाळ पासूनच येथील बाजारपेठ संपूर्णतः बंद होती.
एस टी महामंडळाने ही एक ही बस न सोडल्याने प्रवासी नागरिकांचे मोठे हाल झाले. त्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला. दिवसभरात एक ही बस धावली नाही, शासनाच्या मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिकेचा जाहीर निषेध ही व्यक्त करण्यात आला.बंद शांततेत् पार पडला.

……………………………………………………………………….

मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षणासंदर्भात झालेले ठिय्या आंदोलन राज्यभर गाजले होते. त्याच आंदोलन स्थळी पुनश्च मराठा बांधव बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली

परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत हे आंदोलनाला सुरुवातझाली असून या मध्ये मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या १) मराठा समाजाचा सरसकट 50 टक्के आतील ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्यात यावा २) महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ३) नुकत्याच जालना जिल्ह्यातील चाराठा अंतरवाली या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यांवर महिला व आभालवृद्ध यांच्यावर झालेला अमाणूस लाठी चार्ज करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे ४) कोपर्डी येथील पिढी ताईच्या मारेकरयांना तात्काळ फाशी देण्यात यावी ५) कै अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तरुण उद्योजकांना विनागहानखत न करता तात्काळ आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलन कर्ते उठणार नाहीत अस सांगण्यात आले.

…………………………………………………………………………..

◾ सखोल चौकशीची पंकजाताई मुंडे यांची मागणी- मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.एक ट्विट करून त्यांनी ही मागणी केली आहे.

जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले. यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान काल शुक्रवारी ६ च्या सुमारास अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर अश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा पंकजाताई मुंडे यांनी निषेध केला आहे. याबाबत ट्विट करत पंकजाताई मुंडेंनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

……………………………………………………………………….

◾ सौ.सुदामतीताई रत्नाकर गुट्टे- मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जगापुढे आदर्श निर्माण करत लाखोंचे ५८ मोर्चे अतिशय शांततेत काढणारा मराठा समाज आजही आपल्या न्याय हक्कासाठी शांततेत आंदोलन करत आहे. परंतु शांत असलेल्या मराठा समाजावर कुठलेही कारण नसताना अशाप्रकारे अमानुष मारहाण करून देशात आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचा भाजप सरकारचा डाव असुन या घटनेचा जाहिर निषेध राष्ट्रवादी नेत्या  यांनी नोंदवला आहे.