परळी पूर्णा परळी रद्द, तर काही गाड्या अंशतः रद्द

बीड/ परळी वैजनाथ- एमएमसी न्यूज नेटवर्क– परळी वैजनाथ मार्गे धावणाऱ्या परळी पूर्णा परळी ,रद्द तर परळी आदीलाबाद ,परळी -निजामबाद, परळी- अकोला या गाड्यांच्या दैनंदिन  धावण्याच्या वेळेत बदसल तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

नांदेड विभागातील रेल्वे पटरी च्या दुरुस्तीनिमित्त घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे हा परिणाम होणार आहे. परळी पूर्णा परळी, ही गाडी  पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्यात आली असून परळी आदीलाबाद परळी पूर्णा व इतर काही गाड्या उशिरा धावणार आहेत.