गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात,तिघांना अटक.

क्राईम

चंद्रपूर : शहरातील बल्लारपूर बायपास रस्त्यावर स्कार्पिओ वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक करून सुमारे सव्वा पाच किलो गांजासह १६ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्याची नावे यश राज दुर्योधन नेहाल, इकरार ठाकूर दोघे रा. गडचिरोली, सगीर खान ननुआ खान मूळ रा. निकोनी शाहायपूर, उत्तर प्रदेश.अशी आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या माहिती नुसार स्कार्पिओ गाडी क्रमांक एम.एच. ३३ एसी ११०१ यामधून बल्लारपूर बायपास रस्त्या वर अमली पदार्थाच्या विक्री करणार असल्याच कळले, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बायपास रस्त्यावर सदर गाडीचा शोध घेतला, यावेळी परिसरातील बजाज विद्या निकेतन शाळेच्या बाजूला  सदर गाडी आढळून आली. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता एका निळ्या प्लास्टिक पिशवीमध्ये ५२ हजार १३० रुपये किमतीचा सुमारें पाच किलो २१३ ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजासह १६ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांनाही अटक केली.