पुणे /एम एन सी न्यूज नेटवर्क- : राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसच्या पुणे येथील विभागीय कार्यालयाचा उदघाटन सोहळा उत्साहात पाडला. लाखो डॉक्टर्स व इंजिनिअर्स घडविणाऱ्या राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसच्या पुणे येथील विभागीय कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा बंसल क्लासेस प्रा.लि.चे मॅनेजींग डायरेक्टर समीर बंसल सर यांच्या शुभ हस्ते व बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 08.30 वाजता पार पडला.
पुणे शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना NEET, IIT-JEE सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी बंसल क्लासेस उच्च शिक्षीत, तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत शैक्षणिक सेवा पुरवित आहे. विद्येचे माहेर घर म्हणजेच पुणे येथील विद्यार्थी व पालकांच्या सुविधेसाठी बंसल क्लासेसच्यावतीने विभागीय कार्यालय प्लॉट नं. 1187/11, तीसरा मजला यशोधन कॉम्प्लेक्स, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे सुरू करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रा. कैलास घुगे सर, एचआर विभागाचे प्रमुख स्पर्श द्विवेदी सर, स्टेट हेड प्रा. विष्णू घुगे सर, चिफ ॲडमिनिस्ट्रेटर राकेश चांडक सर, व्हाईस स्टेट हेड एस. एस. कादरी सर, व्हाईस स्टेट हेड सत्यजीत हैबते सर,गार्डिअन मॅनेजर सुरेश घुगे सर, सेल्स हेड नामदेव कराड सर, बंसल क्लासेस पुणे (शाखा: बिबवेवाडी) संचालक प्रतीक बजाज सर, बंसल क्लासेस पुणे (शाखा:वानवडी) संचालक संजीव हाडे सर, डिव्हीजनल हेड संतोष जायभाये सर, डिव्हीजनल कॉर्डिनेटर संध्या पांडे यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती.