बीड/ परळी वैजनाथ- एमएमसी न्यूज नेटवर्क-जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटे येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषणकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ला आणि गोळीबार प्रकरण सध्या चिघळत आहे. परळीतील तहसील कार्यालया समोर मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने पुनश्च ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान काल दि.४ रोजी ठिय्या महाराष्ट्राचे नूतन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.
जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटे या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणकर्त्यावर पोलिसांकडून झालेल्या आणि गोळीबार याचा निषेध आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत परळी शहरातील तहसील मैदानावर पुनश्च मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज या आदरणीय स्थळाला भेट दिली आणि आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली.
