अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 7 सप्टेंबर रोजी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर

🔷 जो बायडेन यांच्या पत्नी जिल या कोविड पॉझिटिव्ह: तर बायडन यांचा अहवाल निगेटिव्ह.

वॉशिंग्टन- सात सप्टेंबर पासून चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा कोविड अहवाल निगेटिव्ह तर त्यांच्या पत्नी जील या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. भारतात G20 शिखर परिषदेसाठी येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन या कोविड पॉझिटिव्ह आहेत. बायडेन 7 सप्टेंबरला भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावर व्हाईट हाऊस म्हटले आहे की, बायडेन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल बायडेन यांना डेलावेअरमधील त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसने म्हटले आहे की त्यांची लक्षणे अगदी किरकोळ आहेत. दरम्यान, त्या डेलावेअर येथील निवासस्थानी राहणार आहेत. त्यांच्या संपर्क अधिकाऱ्याने सांगितले की व्हाईट हाऊस मेडिकल युनिटने जवळच्या लोकांना याबद्दल माहिती दिली आहे.

Pc – POLITICO