बीड/ परळी वैजनाथ- एमएमसी न्यूज नेटवर्क–:- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे, आंदोलने, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज 2 सप्टेंबर 2023 पासून ठिय्या आंदोलनास बसला आहे. या आंदोलनास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. दि 6 सप्टेंबर 2023 रोजी पाचव्या दिवशी विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. दिवसेंदिवस परळी येथील आंदोलनाची धार मोठ्या प्रमाणात वाढत असून विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख ,मराठवाडा शिक्षक नेते पी एस घाडगे, ज्येष्ठ नेते जनार्धन गाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, जागृती ग्रुपचे सर्वेसर्वा गंगाधर शेळके, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा एम एल देशमुख ,जिल्हा परिषद सदस्य प्रा डॉ मधुकर आघाव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, तालुका अध्यक्ष गौतम साळवे, झुंजार छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी काळे ,जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे युवक तालुका महासचिव ज्ञानेश्वर गीते ,काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शिवसेना नेते बाळासाहेब शेप, शहर प्रमुख राजेश विभुते, शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख संतोष चौधरी, शहर संघटक आनंद शिंदे, शिवव्याख्याती वैष्णवी साबळे, बोरखेड चे सरपंच ज्ञानेश्वर वानखेडे, सतीश काळे ,रामेवाडीचे उपसरपंच भगवान पोळ, गोविंद पोळ, संभाजी ब्रिगेड तालुका प्रसिद्धीप्रमुख विष्णुपंत पतंगे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, गजेंद्र मगर, डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर सोनवणे, संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष प्रादुंभ सोनवणे, टाकळी दे चे ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे ,युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे, सतीश भोसले, इंजिनीयर दिनेश हजारे, विजयकुमार आप्पा कस्तुरे, पिंपळगाव गाडे येथील राहुल सोनवणे, शरद सोनवणे, लिंबोटा येथील संदीप दिवटे, हनुमान दिवटे, नारायण दिवटे, टोकवाडी चे नितीन भोसले, कुलदीप काळे, स्वप्निल काळे, स्वप्नील सरांडे, समाधान काळे, प्रथमेश कावरे, दयानंद बनसोडे, गणेश आबा काळे ,आकाश जाधव ,सचिन भोसले, सोमनाथ भोसले ,वृक्षराज नाना काळे, निकेश पाटील, लक्ष्मण काळे, संतोष सपाटे आदींनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आपला पाठिंबा दिला आहे.