बहुप्रतिक्षीत इन्व्हेस्टर्स समीट-2023 ला मोठा प्रतिसाद

व्यावसायीकांनी शिक्षण क्षेत्रात यावे : चंदुलालजी बियाणी 

पुणे /एम एन सी नूज नेटवर्क- राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसद्वारे आयोजित इन्व्हेस्टर्स समीट-2023 कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
लाखो डॉक्टर्स व इंजिनिअर्स घडविणाऱ्या बंसल क्लासेसने नवउद्योजकांना शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इन्व्हेस्टर्स समीट-2023 कार्यक्रमाच्या द्वितीय सत्राचे आयोजन केले होते. बंसल क्लासेस प्रा.लि.चे मॅनेजींग डायरेक्टर समीर बंसल सर व बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाला पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील उद्योजकांनी तसेच स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या भावी व्यावसायीकांनी हजेरी लावली होती.

इव्हेस्टर्स समीट-2023 या कार्यक्रमाचे 3 सप्टेंबर, रविवारी रोजी हॉटेल द डेक्कन रोयाल, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बंसल क्लासेस प्रा.लि.चे एमडी समीर बंसल, बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी, बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रा. कैलास घुगे, एचआर विभागाचे प्रमुख स्पर्श द्विवेदी, स्टेट हेड प्रा. विष्णू घुगे, चिफ ॲडमिनिस्‍ट्रेटर राकेश चांडक, व्हाईस स्टेट हेड एस. एस. कादरी , व्हाईस स्टेट हेड सत्यजीत हैबते सर,गार्डिअन मॅनेजर सुरेश घुगे , सेल्स हेड नामदेव कराड , बियाणी उद्योग समूहाचे मिडिया हेड अनिकेत सराफ , बंसल क्लासेस पुणे (शाखा:बिबवेवाडी) संचालक प्रतीक बजाज, बंसल क्लासेस पुणे (शाखा:वानवडी) संचालक संजीव हाडे, बंसल क्लासेस केज व कळंब शाखेचे संचालक हारूणभाई इनामदार, बंसल क्लासेस हिंगोली शाखेचे संचालक सुनिलजी देवडा, डिव्हीजनल हेड संतोष जायभाये , डिव्हीजनल कॉर्डिनेटर संध्या पांडे यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती.

🔷 शैक्षणिक सेवेसाठी सदैव तत्पर : चंदुलालजी बियाणी
बंसल क्लासेसच्या उच्च शिक्षीत, तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी देदिप्यमान असे ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारचे शिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी बंसल क्लासेसच्या मार्गदर्शनाच्या जोरावर अकल्पनीय कामगिरी करत डॉक्टर व इंजिनिअर होतील. यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी नवउद्योजकांनी, भावी व्यावसायीकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करणे गरजेचे आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाकडे समाजतील प्रत्येकजण आदरानेच पाहत असतो, कारण शिक्षण क्षेत्रात व्यवसाय केल्याने विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य मिळते. आजचे विद्यार्थी हा उद्याचा समाज आहे आणि चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या भावी व्यावसायीकांना चांगल्या संधी उपलब्ध करून
देणे व त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी मी सर्देव तत्पर असल्याचे यावेळी मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी  यांनी सांगितले.

🔷 भावी व्यावसायीकांनी संधीचे सोने करावे : समीर बंसल
बंसल क्लासेसचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली बंसल क्लासेस महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात येथोचित मार्गक्रमण करत विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याची दारे उघडी करून दिली आहे. आपणही शिक्षण क्षेत्रात व्यवसाय करून विद्यार्थ्यांना बंसल क्लासेस मार्फत शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो.
यासाठी मुख्य प्रवर्तक बियाणी सर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचा व्यावसायीकांनी लाभ घेत शिक्षण क्षेत्राकडे वळावे असे आवाहन यावेळी बंसल क्लासेस प्रा.लि.चे एमडी समीर बंसल सर यांनी केले.