राजस्थानी मल्टीस्टेटचे प पु संत अलकाश्रीजी यांच्या हस्ते नवीन जागेत स्थलांतर

🔷 दिवसभर मान्यवरांनी दिल्या भेटी

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-   परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी च्या परळी येथील मुख्य कार्यालय व मुख्य शाखेचे प.पु.संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते गुरुवारी (ता.७) नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.

परळी येथील  राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. परळी च्या मुख्य कार्यालय व मुख्य शाखेचे परळी येथील घरणीकर रोडवरीलभव्य इमारतीत गुरुवारी (ता.७) दुपारी एक वाजता प.पु.संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते स्थलांतर करण्यात आले. अलकाश्रीजी यांचे राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. स्थलांतरा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा श्री व सौ प्रेमलता बद्रीनारायण बाहेती यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल मो. बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजयप्रकाश लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, सौ. प्रेमलता बाहेती, सौ. कल्पना बियाणी, नामदेव रोडे, अजय पुजारी, कार्यकारी संचालक जगदिश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही बी कुलकर्णी, शाखा व्यवस्थापिका सौ. वंदना कांबळे यांच्यासह कर्मचारी, पतसंस्थेचे ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.