जी-२० परिषदेला आज दिल्लीत सुरुवात

दिल्ली- जगातील 20 सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांच्या जी-२० परिषदेला आज दिल्लीत सुरुवात होतेय. या परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली असून सुरक्षेसाठी अत्यंत कडक उपाययोजना करण्यात आल्यात. आज सकाळी साडेनऊ ते साडेदहा या दरम्यान, जी-२०च्या सर्व नेत्यांचं प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये आगमन होईल. त्यानंतर जी-२० परिषदेतील पहिलं सत्र म्हणजे ONE EARTH ला सुरुवात होईल. दुपारच्या जेवणानंतर तीन ते पावणेपाच पर्यंत ONE FAMILY हे दुसरं सत्र असेल. त्यानंतर रात्री ८ ते सव्वा नऊ या वेळेत सर्व राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल. तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जी-२०च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलंय.

जी 20 समीट चे सदस्य राष्ट्र अर्जेंटिना, अस्ट्रोलिया,ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रांस, जर्मनी, भारत,इंडोनेशिया, इटली, जपान,रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रुसिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, तुर्की,युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स असें आहेत.

दुपारच्या जेवणानंतर तीन ते पावणेपाच पर्यंत ONE FAMILY हे दुसरं सत्र असेल. त्यानंतर रात्री ८ ते सव्वा नऊ या वेळेत सर्व राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल. तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जी-२० च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलंय. आज आणि उद्या ही परिषद आहे.