कुणबी – मराठा एकच-इंजि.भगवान साकसमुद्रे

आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा.

बीड/ परळी वैजनाथ- एमएनसी न्यूज नेटवर्क– :- परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज 2 सप्टेंबर 2023 पासून ठिय्या आंदोलनास बसला आहे. काल 6 सप्टेंबर आमरण उपोषणास व्यंकटेश बाबुराव शिंदे, देवराव लुगडे महाराज, शरद आबासाहेब चव्हाण हे बसले आहेत. या आंदोलनास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आज दि ९ रोजी या आंदोलनाच्या 8 व्या दिवशी स्टुडन्ट फॉर रिकंट्रक्शन ऑफ सोसायटी या संघटनेच्या वतीने फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी परळी शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, देवराव लुगडे महाराज,पत्रकार जगदीश शिंदे, एडवोकेट संजय फुन्ने, आदी ची उपस्थिती होती.

यावेळी साकसमुद्रे म्हणाले की,कुणबी -मराठा एकच आहेत. विदर्भातील कुणबी मराठा समाजासोबत मराठवाड्यातील मराठा समाजाचे रोटी भेटीचे व्यवहार आहेत. जर रोटीबटीचे व्यवहार असतील तर कुणबी व मराठा एकच आहेत यात तीळ मात्र शंका घेण्याचे कारण नाही.जे मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध करत आहेत यामागे काही राजकीय शक्ती कार्यान्वित आहेत. या आरक्षणास विरोध करणाऱ्या अपप्रवृत्तीचाही त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला.