मराठा क्रांती मोर्चाच्या आमरण उपोषण व ठिय्या आंदोलनाचा आठव्या दिवस,मुंडण आंदोलनासह विविध पक्ष संघटनांचा वाढता पाठिंबा
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहणार- व्यंकटेश शिंदे
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-:- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे, आंदोलने, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज 2 सप्टेंबर 2023 पासून ठिय्या आंदोलनास बसला आहे. तर काल 6 सप्टेंबर आमरण उपोषणास व्यंकटेश बाबुराव शिंदे व शरद आबासाहेब चव्हाण हे बसले आहेत या आंदोलनास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. दि 8 सप्टेंबर 2023 रोजी आठव्या दिवशी विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.दरम्यान उपोषणकर्ते व्यंकटेश शिंदे व शरद चव्हाण यांची प्रकृती खालावली असून शरद चव्हाण यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर व्यंकटेश शिंदे यांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहणार असल्याचे सांगितले. आठव्या दिवशी काही आंदोलनकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा जाहीर निषेध केला दिवसेंदिवस परळी येथील आंदोलनाची धार मोठ्या प्रमाणात वाढत असून विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.
आंदोलनाच्या आठव्या दिवशी युवक नेते रामेश्वर मुंडे, एम आय एम शहर कार्याध्यक्ष फिरोज खान जनाब, युवक शहराध्यक्ष अनुभाई शेख ,युवा नेते मोहसीन भाई शेख, ओबीसी ऑर्गनेशनचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा भाई शेख, प्रा भास्कर निर्मळ, विठ्ठल राव विखे पाटील कृषी जिल्हा अध्यक्ष ईश्वर सोनवणे, भागवत भांड म्हणजेच सगळे प्रल्हाद सोळंके शिवदास लोणकर प्रवीण धोंडगे पाटील निकेश पाटील उमाजी काळे नितीन भोसले तसेच मिरवट, टोकवाडी या गावातील साडेतीनशे तरुणांनी मोटरसायकल रॅली द्वारे आज आंदोलनामध्ये सहभागी झाले तसेच नागापूर, पिंपळगाव गाडे, टोकवाडी, कौडगाव, दादा हरी वडगाव, शेलु यांसह विविध गावातून शेकडो लोकांनी आज आंदोलनाला भेटी दिल्या आज मुंडन आंदोलनामध्ये अमोल सूर्यवंशी, केशव साबळे ,महादेव काळे , यांनी आपले मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच आज आठव्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी आंदोलनाला भेटी दिली व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आपला पाठिंबा दिला आहे.