आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी

मोरक्कन सरकारने २००० हून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी,देशभरात शोककळा,भूकंपाचा केंद्रबिंदू अल-हॉज प्रांतात,

मोरोक्को: आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. आतापर्यंत, मोरक्कन सरकारने २००० हून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.लोक आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत, हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विध्वंसात हजारो लोक जखमी झाले आहेत. ज्या भागात भूकंपांचे हादरे बसले त्या भागातील प्रत्येक इमारत कोसळली आहे. यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. . तर आपत्कालीन पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.मोरोक्को येथे शुक्रवारी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्यामध्ये आतापर्यंत दोन हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, दोन लोक एका बाकावर बसलेले दिसत आहेत.

पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेल्या देशातील माराकेश शहरात हा मोठा भूकंप झाला.  ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. किमान २०१२ लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर २०५९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १४०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या अल-हॉज प्रांतात १,२९३ मृत्यूची नोंद झाली आहे. तरौदंत प्रांतात ४५२ मृत्यू झाले आहेत. हे दोन सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आहेत. उत्तर आफ्रिकन प्रदेशात हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता.