G20- uk pm Rishi Sunaks With Bangladesh PM Sheikh Hasina At G20
दिल्ली- दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय जी-२० परिषदेनिमित्त जगातील बलाढ्य देशांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षताही सहभागी होण्यास दिल्लीत आले आहेत. यात प्रामुख्याने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बातचीत करतानाचा त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या वागण्यातील अतिशय साधेपणा, मोकळा स्वभाव याच्यामुळे ती ते छायाचित्र सर्वांना भावले आहे. “एका देशाचे पंतप्रधान असूनही त्यांच्यात किंचितही अहंकार दिसला नाही”, असे अनेकांनी म्हटले आहे. दिल्लीत दोन दिवस झालेल्या परिषदेच्या बैठकीनिमित्त ते पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यात आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह बातचीत करतानाचा त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
अनवाणी पायांनी गुडघ्यावर बसून बांगलादेशच्या पंतप्रधानांशी केली बातचीत, मग ती पीएम मोदींची घेतलेली भेट असो किंवा पहाटे पत्नीसोबत अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेणे असो. माणूस त्याच्या ताकदीने नाही, तर त्याच्या निर्मळ स्वभावाने ओळखला जातो. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकदेखील अशा लोकांपैकी एक आहेत; ज्यांनी आपल्या स्वभावामुळे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.
जी-२० परिषदेनंतर झालेल्या एका बैठकीदरम्यान ऋषी सुनक आणि बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांचा एक फोटो व्हायरल होत आहे; ज्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान अनवाणी गुडघ्यावर बसून शेख हसीना यांच्याशी बोलत असल्याचे दिसत आहे. शेख हसीना खुर्चीवर बसून बोलत असताना सुनक मात्र त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आरामात गुडघ्यावर बसले आहेत. या साधेपणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. त्यामुळे दोघांचा हा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी सुनक यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. “एका देशाचे पंतप्रधान असूनही त्यांच्यात किंचितही अहंकार दिसला नाही”, असे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी, “हा खूप सुंदर फोटो असल्याचे म्हणत सुनक खूप सज्जन आहेत”, असे म्हटले आहे.
PC-Praveen Lenny/X (Twitter)