मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस पावसाची शक्यता

🔷 हवामान विभागाचा अंदाज; 

औरंगाबाद- एम एन न्यूज नेटवर्क– मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या प्राप्त  हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर व ईतर जिल्ह्यात बुधवार ,रविवार दरम्यान आकाश ढगाळ राहुन हलका ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. या पावसाळ्यात कुठे धो धो तर कुठे हलका ते मध्यम व अशा पद्धतीने स्थळनिहाय पडणाऱ्या पर्जन्यमानात कमालीचा फरक राहणार आहे.

ऑगस्ट महिन्यातील कोरड्या दिवसानंतर सप्टेंबर ची सुरुवात ही पहिले पाच दिवस कोरडे ठाक गेले. मात्र, औरंगाबाद शहर आणि जिल्हा परिसरात ९ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सुमारें ६८ मिमी पाऊस पडला. यामुळे मोठा दिलासा मिळाला.चारा आणि पाण्याच्या दुष्काळाचे तीव्रता थोडी कमी झाली असून . गेल्या तीन दिवसांपासून ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस पडण्याची नोंद झाली. शहरात उघडीप होती. तर १३ व १४ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १५ ते १७ सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी १० ते ३० किमी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. प्रादेशिक वेध शाळेच्या विस्तारीत अंदाजानुसार १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान आकाशात अंशतः ढगाचे आच्छादन राहणार आहे. अधून मधून जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. खरीप बरोबरच रब्बी पेरणीसाठी खुप उपयोग होईल.

🔷 मराठवाड्यात तापमानात  वाढ

एकूणच या पाऊस काळामध्ये बरेचशे दिवस पावसा शिवाय गेले आहेत कुठे 25 दिवस कुठे पन्नास दिवस पाऊस पडलाच नाही. ऑक्टोबर मध्ये जाणवणारी हिट यंदा ऑगस्ट मध्ये जाणवत होती कमाल तापमानात गत दोन दिवसांपासून दोन अंश सेल्सियसने वाढ होवून ते ३१.५ तर किमान तापमान स्थिर आहे. दिवसाचे तापमान वाढीमुळे  उकाड्यात वाढ आहे.