‘शोले’ फेम अभिनेते बिरबल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Birbal Passed Away:

५०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका,
बिरबल यांचे मुंबईतील खासगी रुग्णालयात झाले निधन.

मुंबई- “बिरबल” या नावाने प्रसिद्ध सतींदर कुमार खोसला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ८४ वर्षांचे होते.
ज्येष्ठ अभिनेते सतींदर कुमार खोसला यांचे मंगळवारी सायंकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. शोले सह त्यांनी सुमारें ५०० पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी विनोदी अभिनेत्याच्या भूमिका केल्या. चित्रपट रसिकांना ते त्यांच्या चेहऱ्यावरच्या मिश्किल भाव व शारीरिक हालचालीमुळे कायम लक्षात राहत असत. शोले चित्रपटातील त्यांची भूमिका आजरा अमर झाली आहे.
चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह अनेकांनी सतींदर कुमार खोसला यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) ट्वीट करून बिरबल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.