राजस्थानीज पोदार स्कूल येथे हिंदी दिवस साजरा..

🔸देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला त्याची जोपासना करा -बद्रीनारायण बाहेती

परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- राजस्थानी पोदार स्कूलमध्ये आज दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हिंदी दिवस साजरा करण्यात आला.या हिंदी सप्ताह मध्ये विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, वकृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. हिंदी दिनाचा इतिहास पाहता स्वातंत्र्यानंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला अश्या विविध माहिती द्वारे विद्यार्थ्यांनी आपआपले मनोगत मांडले.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे जिथे सर्व लोक वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या चालीरीती पाळतात पण देशातील 77 टक्के लोक हिंदी बोलतात, समजतात आणि लिहितात. हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. संपूर्ण देश 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करतो जेणेकरून देशात हिंदी भाषेला अधिक चालना मिळावी. म्हणून दरवर्षी या विशेष दिनानिमित्त राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

दि 14 सप्टेंबरला हिंदी दिन ही तारीख सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडली होती.1953 पासून, राष्ट्रीय भाषा संवर्धन समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला. तो आपण जोपासला पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पोदार स्कूलचे सचिव बद्रीनारायण बाहेती यांनी केले.

यावेळी पोदार स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम साजरा झाला.

हिंदी विभागप्रमुख अंकुश पवार, शिक्षिका पूनम मुंडे, शिक्षिका मनीषा वाघ, शिक्षिका अंजली नानावटे, शिक्षिका पठाण मॅडम आदीनी हिंदी सप्ताह मध्ये परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय विद्यार्थी अक्षदा मोरे, युविका तडस, निहार रोडे, पिहू जाजू यांनी केले.तर शिक्षक रुपेश वावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले अशी माहिती शाळेचे उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी यावेळी दिली.