तीन लाख रुपयांची लाच प्रकरणी सीबीआय ने ईशान्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. सी. जोशी यांना केली अटक

लाच/लाचखोर-

सीबीआयने सापळा रचून के.सी. जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले, त्याच्या गोरखपूर, नोएडा येथील दोन निवासस्थानांवर छापे टाकून २ कोटी ६१ लाख रुपयांची रोख रक्कम जप्तकेली.

के.सी जोशी हे १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS) अधिकारी

उत्तर प्रदेशा/लखनौ/गोरखपूर : कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी के. सी. जोशी यांना अटक केली.  तसेच कंपनीची सरकारी नोंदणी आणि नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई केली. सीबीआयने जोशीच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही छापे टाकले. तिथून २.६१ कोटी रुपयांची रोकड जप्त

“ईशान्य रेल्वे, गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य अधिकारी के.सी.जोशी यांना मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरने सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्याने आरोप केला आहे की, केसी जोशी यांनी त्याच्याकडे लाच मागितली होती, ती न दिल्यास त्याच्या कंपनीस नुकतेच मिळालेला करार रद्द करण्याची धमकी दिली होती. सीबीआयने सापळा रचून के.सी. जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले आणि त्याच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकून २.६१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

लाचखोर अधिकाऱ्याच्या घरावर CBI च्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी या रेल्वे अधिकाऱ्याच्या घरात कोट्यावधीचे घबाड सापडले. उत्तर प्रदेशातील या अधिकाऱ्याच्या घरातून 2.61 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेय. या अधिकाऱ्याला 3 लाखांची लाच घेतना अटक करण्यात आली होती. यावेळी तपासारदम्यान त्याने लाचखोरीतून जमवलेल्या कोट्यावधीच्या मालमत्तेचा पर्दाफाश झाला आहे