केरळमध्ये २०१८ मध्ये १९ पैकी १७ जणांचा या विषाणूमुळे मृत्यू , केरळमध्ये निपाचे आढळलेल्या संशयित रुग्णांमुळे आता संपूर्ण देशात या विषाणूबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटची केस २०१९ मध्ये केरळमधील २३ वर्षीय विद्यार्थ्याची नोंदवली गेली होती.
केरळ/ कोझिकोड- भारताच्या दक्षिणेतील केरळ राज्यामध्ये पुन्हा एकदा निपा या विषाणूचा उद्रेक दिसून येत असून हा विषाणू आढळल्यामुळे संपूर्ण देशात या विषयाबाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे.केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपा या घातक विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केरळमध्ये निपाची बाधा होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, आणखी चार संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे निपा विषाणू आता आरोग्य विभागासमोर नवे संकट उभे करीत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि केरळ राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांनी सावधानता बाळगत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी संशयितांचे नमुने गोळा करीत तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV)कडे पाठवत आहेत.
आता निपाचे नमुने पॉझिटिव्ह आढळ्यास चार वर्षांत देशातील ही पहिलीच घटना असेल. कारण- निपा विषाणूची शेवटची केस २०१९ मध्ये केरळमधील २३ वर्षीय विद्यार्थ्याची नोंदवली गेली होती. यावेळी विषाणूचा फैलाव फक्त एकाच केसमध्ये आढळला होता; ज्यातून तो विद्यार्थी पूर्णपणे बराही झाला होता. यावेळी यामुळे निपा विषाणूचा पुन्हा वाढणारा धोका लक्षात घेऊन तिरुवनंतपुरममधील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड व्हायरॉलॉजीचे संचालक डॉ. ई. श्रीकुमार यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे.
विषाणूजन्य संसर्ग- निपा हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे; जो प्रामुख्याने , कुत्रे व घोडे,वटवाघूळ, डुक्कर या प्राण्यांना प्रभावीत करतो. हा जुनोटिक प्रकारचा विषाणू असल्याने माणसाला संक्रमित करू शकतो. त्यानंतर माणसांकडून माणसांमध्येही त्याचा प्रसार होत आहे.
निपा विषाणूची लक्षणे –हा विषाणू मज्जासंस्था आणि मेंदूवरही आघात करतो तीव्र ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार,खोकला आणि घसा खवखवणे,उलट्या होणे,स्नायू दुखणे आणि तीव्र कमजोरी, लक्षणे पाहता, केरळमधील दोन रुग्णांमुळे धोका वाढण्याची शक्यता आहे,निपा विषाणूची गंभीर लक्षणे पाहता, संशयित प्रकरणांचा लवकर शोध घेणे आणि पुढील प्रसार रोखणे आवश्यक आहे. कारण- संसर्गानंतर रुग्णांची येणारी पॉझिटिव्ह चाचणी पाहता, मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.निपा विषाणू कोरोना वेगाने पसरत नाही. अशी माहिती तिरुवनंतपुरममधील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड व्हायरॉलॉजीचे संचालक डॉ. ई. श्रीकुमार यांनी दिली. यावर ते म्हणाले की, निपा विषाणूच्या संसर्गाचा पूर्वीचा इतिहास आणि विषाणूचे स्वरूप असे सूचित करते की, ते इन्फ्लूएंझा, कोविड-१९ किंवा अत्यंत संसर्गजन्य गोवर इतक्या वेगाने पसरू शकत नाही.
संसर्ग-घरात किंवा हॉस्पिटलमध्ये संक्रमित व्यक्तीच्या जवळून संपर्कात आल्यासही हा विषाणू इतर लोकांमध्ये पसरू शकते. निपाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह हाताळल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो. त्याशिवाय संसर्ग बंदिस्त खोली, गर्दीच्या वातावरणात हा विषाणू पसरतो. हा विषाणू हवेशीर जागेत सहसा पसरू शकत नाही, असे डॉ. श्रीकुमार म्हणाले.डॉ. श्रीकुमार यांच्या मते, स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण ज्या भागात प्रकरणे आढळून आली, त्या भागातील लोकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी इतर संपर्कात येण्यापासून स्वत:ला रोखले पाहिजे.
PC-The-week