गौरी आणि गणेशोत्सव ही सर्वांसाठीच आनंदाची पर्वणी असते. गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट आणि राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये अधिकारी, सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी यांच्या मुलाखती व विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी राज्यस्तरीय ऑनलाईन गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी स्पर्धक विजेत्यांना सार्वजनिक गणेश मंडळांसाठी प्रथम बक्षीस ११००१ रुपये, द्वितीय बक्षीस ७००१ रुपये, तृतीय बक्षीस ३००१ रुपये याप्रमाणे तर महालक्ष्मी व घरगुती गणेश स्पर्धासाठी स्वतंत्र बक्षिसे प्रथम बक्षीस ५००१ रुपये, द्वितीय बक्षीस ३००१ रुपये, तृतीय बक्षीस २००१ रुपये याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे करा संपर्क
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर फुटके – 9325063512, मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे – 9422094111, डॉ.प्रभू गोरे – 9075716739 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.