🔷 जुनी डबल डेकर बस संग्रहालयात तर नवीन एसी इलेक्ट्रिक डबल डेकर आली मुंबई च्या रस्त्यावर
मुंबई – गावाकडून मुंबईत येणाऱ्या अनेकांची आवडीची मुंबईतील डबल डेकर बस आता रस्त्यावर दिसणार नसून त्याची जागा इलेक्ट्रिकल बस येत आहे नुकताच मुंबईमध्ये जुन्या डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बस चा निरोप समारंभ पार पडला. सुमारें 50-60 वर्षपासून मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या डबल डेकर बस आता धावणार नाहीत. शुक्रवारी बसने अखेरचा प्रवास केला. फुलांनी आणि फुग्यांनी सजवून बसला निरोप देण्यात आला. सजवलेल्या डबल डेकर बस मधून निरोपाचा वेळी शेवटचा प्रवास आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.
संग्रहालयात डबल डेकर बस ठेवण्यात येणार
मुंबईकरांच्या दैनंदीन जगण्यात या डबल डेकर बसचा मोठा वाटा आहे. डिझेल डबल डेकर प्रवास इथेच संपणार नाही. मुंबई ची आठवण म्हणून तिला जतन केलं जाईल, शहरातील संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी बेस्टची डिझेल डबल डेकर बस संग्रहालयात किंवा डेपोमध्ये ठेवण्यात येणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि वातानुकूलित अशा प्रदूषण रहित एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस त्यांची जागा घेतील . बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) प्रदूषण कमी करण्यासाठी या डिझेल बसेसच्या जागी इलेक्ट्रिक बसेस आणत आहे. बेस्टने सर्व डिझेल डबल डेकर बसेस बंद करण्याची घोषणा केली होती, अशा 25 बसेस यापूर्वीच शहरात धावत आहेत.
प्रदूषण कमी करण्यासाठी, मुंबई आणि इतर महानगरामध्ये 2030 पर्यंत सर्व डिझेल बसेसची जागा इलेक्ट्रिक, सीएनजी बसने घेतली जाईल.
PC- wikipedia, Autocar india