राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि अमृत महोत्सव उत्साहात

परळी /एम एन सी न्यूज नेटवर्क-राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी ८ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख सुशील कटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सहसचिव धीरज बाहेती हे होते. तर यावेळी राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील
यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान व हुतात्म्यांचे स्मरण करून लढ्यातील क्रांतिकारकांचा जीवन गौरव शब्दसुमनामध्ये शाळेतील सहसचिव धीरज बाहेती, प्राचार्य मंगेश काशीद तसेच माध्यमिक विभाग प्रमुख सहशिक्षक फराहत शेख यांनी सर्व शिक्षकांसमोर ठेवला. राजस्थानीज पोदार स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हा आयोजित ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुजाता अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश जयतपाल यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले