परळीत बिंगो जुगार वर कारवाई 1,06,320-/ रुपयाचा मुद्देमाल जप्त.

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांना माहिती मिळाली की परळी शहरांमध्ये अवैधरित्या ऑनलाईन बिंगो जुगार काही लोक खेळत व लोकांकडून पैसे घेऊन खेळवत आहेत. सदर माहितीच्या आधारे पथकातील पोलीस आमदार यांना खात्री करण्यास सांगितले व खात्री झाल्यानंतर परळी शहरात दोन ठिकाणी छापे मारून एकूण बारा आरोपी पकडून त्यांच्या व कारवाई केली
 नावे पुढीलप्रमाणे न्यू पेट मोहल्ला येथील कारवाईतील आरोपी 1) आजीज इस्माईल शेख 2) सद्दाम शेख जफार 3) शेख अफरोज अल्लाउद्दीन 4) शेख इरफान युसुफ5) शेख आरिफ शेख हबीब 6) आफताब अफजल खान सर्व राहणार परळी व रेल्वे स्टेशन समोरील कारवाईतील आरोपी पुढील प्रमाणे 1) संदीप त्रिंबक वाघमारे 2) मुंजा अशोक शिंदे 3) विकास साहेबराव जाधव 4)दिलीप बाबुराव पवार5) प्रेमदास ज्ञानोबा पवार 6)बालाजी शामराव चट्टे यांच्यावर 12 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कारवाई करून पोलीस स्टेशन संभाजीनगर व पोलीस स्टेशन परळी शहर यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलीस हवालदार संजय राठोड  पोह तानाजी तागड, अनिल दौंड, रामेश्वर सुरवसे यांनी केली.