खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थिती.
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यनाथ बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मा.सौ.पंकजाताई पालवे – मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाने मा.खा.डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे, खासदार बीड लोकसभा यांच्या विशेष उपस्थितीत श्री विनोदजी सामत यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यनाथ प्रतिष्ठानच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व प्रथम वैद्यनाथ प्रभू, माता सरस्वती, महालक्ष्मी, गणपती तसेच बँकेचे श्रध्दास्थान लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. सभेच्या सुरवातीस बँकेच्या संचालिका तथा मा.खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर मा. अध्यक्ष,मा.उपाध्यक्ष व उपस्थित सर्व सभासदांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोद खर्चे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. सुरूवातीस बँकेचे माजी कार्यकारी संचालक कै.रत्नेश्वरआप्पा कोरे, सभासद कै.रामराव आघाव, कै.दिलीप झुंजे, पत्रकार कै. प्रशांत जोशी, कै.रंजित देशमुख, कै.गजानन डुबे बँक कर्मचारी कै.जयराज फपागिरे, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे व बँकेचे जे सभासद, बँक कर्मचारी तसेच भारतातील राजकीय, सामाजिक, सहकार, कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती बँकेचे ज्ञात-अज्ञात सभासद, हितचिंतक, ठेवीदार, खातेदार पंचतत्वात विलीन झालेले व देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर श्री खर्चे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसचे व मागील वार्षीक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.
बँकेचे अध्यक्ष श्री.विनोदजी सामत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून वैद्यनाथ बँकेच्या प्रगतीचा आढावा व वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय सभेत मांडले. सन २०२२-२३ चा आर्थिक वर्षाचा अहवाल मांडतांना मार्च २०२३ अखेर बँकेचे सभासद ४६,१४० असून बँकेच्या ठेवी रु.८२७ कोटी ९४ लाख व कर्जे रु.४९१ कोटी ६२ लाख आहेत. बँकेने केलेली गुंतवणूक रु.३६४ कोटी ३५ लाखाची आहे. तसेच बँकेने रू.१३२० कोटीच्या व्यवसायाची झेप पूर्ण केली आहे. बँकेने १०४ कोटी ३७ लाख उत्पन्न मिळवलेले आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्याच्या उद्देशाने बँकेने केलेल्या विविध तरतुदी वजा जाता बँकेला करपूर्व नफा ०१ कोटी १३ लाख झाला आहे. बँकेला कर वजा जाता निव्वळ नफा रू. ७५ लाख ०४ हजार झाला असल्याचे सांगितले. तसेच चालू आर्थिक वर्षात १३२० कोटीचा व्यवहार पुर्ण करून बँक २००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे. तसेच मार्च २१ अखेर एकुण एनपीए रक्कम २०२ कोटी २१ लाख तर ग्रॉस एनपीए प्रमाण ३३.८७% व नेट एनपीए प्रमाण २७.६६% होते. मा. सौ. पंकजाताई पालवे-मुंडे व मा. खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे मार्गदर्शनानुसार संचालक मंडळ व कर्मचारी यांचे प्रयत्नांमुळे वसुली झाल्याने एनपीए कमी होऊन मार्च २३ अखेर एनपीए ८७ कोटी ७७ लाख तर ग्रॉस एनपीए प्रमाण १७.८६ % आणि नेट एनपीए प्रमाण ९.२७% आहे. मार्च २४ अखेर नेट एनपीए प्रमाण ४ % पर्यंत ठेवण्याचे प्रयत्न असल्याचे सांगत सर्व थकबाकीदारांना त्यांचेकडील थकबाकीची रक्कम भरणा करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले. बँकेचे श्रध्दास्थान स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब, माजी चेअरमन स्व. मोमय्याजी व स्व.अशोकसेठ सामत यांचा बँकेच्या प्रगतीत सिहांचा वाटा असुन त्यांच्या आशिर्वादानेच बँकेची प्रगती होत आहे. बँकेच्या प्रगतीत माजी चेअरमन तथा जेष्ठ संचालक श्री विकासराव डुबे यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले. मा. सौ. पंकजाताई पालवे-मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी तसेच मा.खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे, खासदार बीड लोकसभा यांनी अहवाल वर्षात त्यांचा बहुमोल वेळ देऊन बँकेस वेळो-वेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मा. संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्यावतीने त्यांचे आभार मानले व उपस्थित सर्व सभासदांनी सभेपुढील विषयास मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून आपले भाषण संपविले.
यानंतर बीड जिल्हयाच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सभेस मार्गदर्शन करतांना सर्व सभासदांचे मनापासुन स्वागत करून बँकेची आर्थिक घडामोडीची आकडेवारी अध्यक्ष श्री विनोदजी सामत यांनी आत्ताच सभे समोर मांडली असल्याचे सांगून यामध्ये बँकेच्या ठेवी, कर्ज, एन.पी.ए.वसुली या ठळक बाबी सभासदांसाठी महत्वाच्या ठरतात. मार्च २०२१ च्या तुलनेत बँकेने एन.पी.ए. मध्ये ११४ कोटी ४३ लाखाची वसुली करून एन.पी.ए. च्या प्रमाणात १८.३९% ने घट केली मार्च २०२३ अखेर बँकेचे एन.पी.ए. प्रमाण ९.२७ % पर्यंत राखून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम केल्याबद्दल बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शेती कर्ज सुटसवलत अंतर्गत बेबाक करता यावे यासाठी बँकेने विशेष योजना लागू केलेली आहे. या योजनेचा थकीत कर्जदारांनी लाभ घ्यावा आणि सर्व सभासदांनी त्यांचे कर्ज खाते नियमीत ठेवण्याचे आवाहन केले. तसेच बँकेने व्यापारी, डॉक्टर, औषध विक्रेते यांचेकरीता सुलभ व्याजदराने सुरु केलेल्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच बँकेने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, अशा शुभेच्छा देऊन आपले भाषण थांबविले.
बँकेच्या या सभेसाठी बँकेचे सभासद, व्यापारी, वकील, डॉक्टर्स, इंजिनीअर्स तसेच बँकेचे चेअरमन श्री विनोदजी सामत, व्हाईस चेअरमन श्री रमेशराव कराड संचालक सर्वश्री नारायणराव सातपुते, प्रकाशराव जोशी, डॉ. राजाराम मुंडे, प्रविणजी देशपांडे, महेश्वरअप्पा निर्मळे, संदिपजी लाहोटी, प्रा. दासूजी वाघमारे, अनिलजी तांदळे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोद खर्च, सरव्यवस्थापक श्री एस.पी. खंदाडे, बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने बँकेचे सन्माननीय सभासद तसेच पत्रकार बांधव उपस्थीत होते. शेवटी बँकेचे संचालक प्रा.श्री. दासूजी वाघमारे यांनी सर्व मान्यवर सभासदांचे आभार व्यक्त केल्यानंतर सभेची सांगता झाली.