अभिनेता विजय अँटोनीच्या मुलीची आत्महत्या

(PC-Filmi Beat)

Actor Vijay Antony daughter Meera dies by suicide. राहत्या घरात घेतला गळफास.

तमिळ सिनेमा इंडस्ट्री मधून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी आली असून दक्षिणात्य चित्रपट निर्माता, संगीतकार आणि अभिनेते असलेल्या विजय अँटोनी यांच्या मीरा नावाच्या मुलीने 19 तारखेला पहाटे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे तमिळ चित्रपटसृष्टीवर शोक कळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मीरा तिच्या चेन्नईमधील अलवरपेट येथील राहत्या घरी पहाटे ३ वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मीरा चेन्नईतील शाळेत शिकत होती.

घरातील मदतनीसला मीरा तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. विजय अँटोनी हे तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. संगीतकार, अभिनेता व निर्माता विजयच्या पत्नीचं नाव फातिमा आहे. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा नावाच्या दोन मुली आहेत, त्यातील मीराने आत्महत्या केली आहे.