प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये श्री गणेशाची उमाताई समशेट्टे यांच्या हस्ते स्थापना

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- सौंदर्य क्षेत्रात अल्प काळामध्ये नावाजलेल्या प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये नगरसेविका सौ. उमाताई समशेट्टे यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
अतिशय कमी काळात प्रतिक्स मेकअप स्टुडिओने सौंदर्य क्षेत्रात नाव केले आहे. विविध प्रकारचे मेकअप आणि अत्याधुनिक हेअरस्टाईलसाठी प्रसिद्ध झालेल्या या स्टुडिओमध्ये प्रथमच श्रींची स्थापना करण्यात आली आहे.

समशेट्टी निवास, प्रेमप्रज्ञा नगर,आयसीआय बँकेच्या समोर असलेल्या प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये नगरसेविका सौ. उमाताई समशेट्टे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून व आरती करून गणरायाची स्थापना करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मेकअप आर्टिस्ट तथा प्रतिक्स मेकअपचे प्रतिक सुरवसे यांनी केले.यावेळी सौ. रत्ना समशेट्टे, सौ. श्रीकंवर बळवंत,सौ. प्रतिभा सुरवसे, अश्विनी बेंबळे आदींची उपस्थिती होती.