दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि. मुख्य कार्यालायत श्रीगणेशची स्थापना

बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क/  वैजनाथ अर्बन को-ऑप.बँक लि. परळी-वै. च्या परळी-वै. येथील मुख्य कार्यालायत श्रीगणेश चतुर्थी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे श्री गणेशाची स्थापना बँकेचे मा.उपाध्यक्ष श्री रमेशराव कराड यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. मागील 19 वर्षापासून बँक कर्मचारी यांच्यावतीने बँकेच्या मुख्य कार्यालयात श्री गणेशाची स्थापना करण्यात येते आहे.

पुढील दहा दिवसांत वेगवेगळे सामाजिक उपक्रम कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहेत, यामध्ये दि.25 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गणेशाच्या स्थापनेवेळी बँकेचे मा.संचालक श्री नारायणराव सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदजी खर्चे, अधिकारी श्री शिवाजी महाळगी, श्री संतोष पवार व वैद्यनाथ बँक कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव व बँकेतील सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट, सभासद, खातेदार, परिसरातील व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.