राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत नेत्रदिपक यश, सहसचिव श्री.धीरज बाहेती .
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद व सेलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमित्त राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा २०२३ प्रायोजक अरोरा कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथील मैदानावर या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत राजस्थानीज पोदार लर्न स्कूल मधील १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विजेते पारितोषिक मिळविले. राजस्थानीज पोदार लर्न स्कूल साठी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे ४ विद्यार्थ्यांची ( पंकज मुंडे, स्वप्नाली कराड, युवराज लोढा, श्लोक कराड ) राष्ट्रीय पातळीवर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्या सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आला यावेळी राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप यांचे ही राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदींनी अभिनंदन केले.