बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- येथील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.१९) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी पतसंस्था मागिल आर्थिक वर्षात नफ्यात आली असल्याचे सांगुन ठेवीदारांचा विश्वास संपादन झाल्याचे सांगितले.
परळी येथील छोट्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करणारी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था म. परळी वैजनाथ ची १९ वी सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.१९) सकाळी ११:०० वाजता पतसंस्थेच्या कार्यालयात झाली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी पतसंस्था सरलेल्या आर्थिक वर्षात नफ्यात आली असल्याचे सांगितले. तसेच पतसंस्थेला यावर्षी ऑडिट वर्ग अ मिळाल्याचे सांगितले. पतसंस्था सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करुण चालविण्यात येत आहे. पतसंस्थेवर ठेवीदारांचा विश्वास वृध्दींगत होत आहे.
मागच्या वर्षात ठेवीमध्ये पंचवीस टक्के वाढ झाली आहे. बहुतांश कर्जदार नियमीत फेड करीत असल्यामुळे पतसंस्थेच्या नफ्यात दरवर्षी वाढ होत आहे. पतसंस्थेच्या आर्थिक पत्रकाचे वाचन सचिव लक्ष्मण वाकडे यांनी केले. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनीता वाघमोडे, संचालक राजाभाऊ आढाव, राजेश्वर निला, सचिन मुंदडा, संजय गोरे, सुमन चव्हाण, सुवर्णा जंगले, विद्या मुंडलीक, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, बसवेश्वर खोत, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश बागवाले, प्रदीप राठोड, राजेश शेटे, वैजनाथ चव्हाण, विष्णु विखे यांनी परिश्रम घेतले.