ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर गाठ आमच्याशी- प्रा. टी.पी मुंडे

मराठवाड्यात कुणबी मराठा नाहीच तो विदर्भात व इतर महाराष्ट्रात,

बीडमध्ये समस्त ओबीसी समाज रस्त्यावर.

बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क- ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं. या प्रमुख मागणी करिता बीडमध्ये समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उतरला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे ओबीसी समाज बांधवांनी लक्ष वेधले आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले जावे मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता, ओबीसींची जनगणना करून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नये अशी भूमिका यादरम्यान मांडण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले. ओबीसी जन मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. टी.पी मुंडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केले.

या ओबीसी आरक्षणाच्या मोर्चा ओबीसीच्या आरक्षणात इतर जातीचा समावेश करू नये, जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढ करावी, या मागणीसाठी हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळेस ओबीसी नेते प्रा‌.टी.पी मुंडे यांनी मराठवाड्यात कुणबी समाजच नाही हा विदर्भात आहे, असं म्हणत जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का जर लावला तर आम्ही हे सरकार ठेवणार नाही. आम्हाला मराठा समाजातील इतर त्यांच्या आरक्षणाबाबतीत कोणताही विरोध नाही, मात्र जर ओबीसीला धक्का लावून हे आरक्षण देण्यात आलं तर ओबीसी समाज या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. असेही यावेळेस या मोर्चादरम्यान प्रा.टी.पी मुंडे यांनी सभेत बोलताना उद्गार काढले मात्र हा मोर्चा सुरुवात झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेत झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळेस अनेक प्रश्नांवर प्रा.टी.पी.मुंडे यांनी हात घालत ओबीसी प्रवर्गातील कोणत्याही गोष्टीला धक्का जर लावला तर यापुढे याद राखा असेही वल्गना यावेळेस करण्यात आली.

भव्य मोर्चामध्ये ओबीसीचे नेते माधवराव मोराळे , प्रा. नरहरी काकडे,विलासराव ताटे, भीमराव मुंडे, विनायक गडदे,आत्माराम कराड,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रफिक भाई कुरेशी, दादासाहेब मुंडे, लक्ष्मण रावजी ढवळे, द्वारकादास फटाले, गोपाळ तांदळे आदींची भाषणे झाली आणि प्रकाश कानगावकर, अर्जुन दळे, महेश लोळगे, किशोर राऊत, संदीप बेंद्रे, रामेश्वर पवार, शेखर जवकर, कैलासजी मर्डे, सूर्यकांत मुंडे, प्रा. विजयजी मुंडे ,प्रदीप मुंडे आदी सह, ओबीसीच्या विविध संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष ,शहराध्यक्ष आणि बीड जिल्ह्यातून विविध गावातून हजारोच्या संख्येने आलेले ओबीसी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनायक गडदे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संदिपान मुंडे यांनी केले. जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत रितसर निवेदन देण्यात आला आहे.