परळी रेल्वे स्थानक परिसरात अनोळखी इसमाचे प्रेत सापडले

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचे प्रेत सापडले असून याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की,परळी रेल्वे स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाखाली एका अनोळखी वयोवृद्ध इसमाचे प्रेत दि.22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आढळून आले. या प्रकरणी लेखी खबर स्टेशन मास्तर यांनी दिली आहे.रेल्वे पोलीस डायरीत नोंद करून ASI उत्तम अवचार पोलीस अमलदार लक्ष्मण पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मयत इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे उंची पाच फूट पाच इंच, रंग गोरा, केस काळे पांढरे, नाक सरळ, कपडे निळ्या रंगाचे टी-शर्ट त्यावर पांढऱ्या रंगाचे शर्ट, भुरकट रंगाची पॅन्ट पायात काळा बूट, कळवा पांढरा, कमरेला लाल करदोडा असे वर्णन असलेल्या एका वयोवृद्ध इसमाचे प्रेत उड्डाणपुलाखाली सापडले आहे.
वरील वर्णनाच्या इसमा बाबत कोणाकडे काही माहिती असेल तर 9767977007 संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलीस परळी यांनी केले आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार उत्तम अवचार हे करीत आहेत.