🔷 नागपुरातील पूरपरिस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा:
नागनदी आणि पूरस्थिती
नागपुरातील पूरक परिस्थितीचा आणि नाग नदीला आलेल्या पुराचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यावेळेस त्यांनी घरात पाणी शिरलेल्यांना तात्काळ 10 हजार रुपयाची मदत , दुकानात पाणी शिरलेल्या व्यवसायिकांसाठी तातडीची मदत म्हणून रुपये 50 हजार देण्याची घोषणा एका वृत्तवाहिनीला वर केली.
आज नागपुरात झालेल्या धुवाधार पावसामुळे नागपुरातील रस्त्यावरच नद्या वाहत असून अनेक सखल भागातील रहिवासी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे . नागपुरातील अनेक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर अनेक तळमजल्याच्या भागात पुराचे पाणी शिरले असून गाड्या अर्ध्या अधिक पाण्याखाली गेले आहेत. अंबाबर्डी, सीताबर्डी येथें अनेक भागात नदी सद्रस्य स्थिती निर्माण झाली आहे. नागपुरातील नाग नदीने आपला रुद्र अवतार दाखवला असून नागपुरातील अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहिले आहे. मान्सूनपूर्व स्वच्छतेत नागपूर महा नगर कार्पोरेशन ने आपल्या आवश्यक अशी स्वच्छता केली नसल्याचे भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आज चार वाजण्याचे सुमारास नागपुरातील अनेक तळमजल्यावर असणाऱ्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, घरातील फर्निचर पाण्यात तरंगत असण्याची अनेक छायाचित्र विविध माध्यमांवर झळकत असून अनेकांच्या घराची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . घरातील फर्निचर इतर साहित्य पाण्यावर तरंगताना चे चित्र सर्वत्र दिसत आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक टाऊनशिप मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेकांच्या दुचाकी या पाण्यात अडकल्या आहेत.
वाडी भागात 229 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
PC- ANI Photo