जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार

जनशताब्दी एक्स्प्रेस आता एलएचबी कोचसह, ताशी १०० ते ११० गतीने धावणार, प्रवाशांच्या वेळेची बचत .

जालना-२४ सप्टेंबर– रेल्व विद्युतीकरण मुळे आता होईल वेळेची बचत. सिकंदराबाद ते परळी वैजनाथ या दक्षिण मध्ये रेल्वेच्या मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे विजयवाडा- शिर्डी, सिकंदराबाद -शिर्डी या गाड्या आता परळी पर्यंत विजेवर धावणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जालना येथून मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही आता विजेच्या इंजिन वर धावणार असून मुंबईकडे जायला पूर्वी 80 ते 90 किमी प्रति तास चा जो रेल्वेचा वेग होता तो आता १०० ते ११० किलोमीटर प्रतितास पर्यंत होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विजेवर धावणाऱ्या लोकंमोटिव मुळे प्रदूषणात ही घट होऊन प्रवास वेगवान होणार आहे. जालनेकरांना मुंबई जवळ करणारी विशेष रेल्वेगाडी म्हणून ओळख असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस आता एलएचबी कोचसह रविवार (२४ सप्टेंबर) पासून पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहे. ताशी ८० ते ९० किमीच्या वेगाने धावणारी ही गाडी आता ताशी १०० ते ११० गतीने धावणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

जालना ते मनमाड या मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यामुळे आता या रुळावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची गती वाढली आहे.मराठवाड्यातील जनतेला एकादिवसात मुंबईतील काम करून परत येण्यासाठी जनशताब्दी ही रेल्वे सुरू करण्यात. आली आहे. सुरुवातीला ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते सीएसटीएमपर्यंत होती. तांत्रिक अडचणींमुळे पुढे ही रेल्वे दादरपर्यंतच नेण्यात येऊ लागली. दुसऱ्यांदा या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला. या गाडीला एलएचबी कोच आणि इलेक्ट्रिक इंजिन जोडण्यात येत असल्याने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. पूर्वी जालना येथून निघालेल्या या गाडीला मनमाड येथे थांबून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिन जोडावे लागत होते.