बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-शहरातील बचपन स्कूल येथे आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे च्या हस्ते आज गणपतीची आरतीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात इंस्टाग्राम द्वारे अवघ्या काही दिवसातच घराघरात ओळख निर्माण झालेल्या या छोट्याशा सेलिब्रिटीचा आज बचपन स्कूलमध्ये विद्यार्थी व शिक्षक वर्गाने उत्साहात स्वागत केले
राज्यात नाहीतर भारतात प्रत्येक गणेश मंडळाच्या समोर आज सर्वात जास्त व्हायरल होणारे गाणे म्हणजे आमच्या पप्पांनी गणपती आणला, या गाण्यामुळे साईराज केंद्रेची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचली आहे. या गाण्यातील साईराजच्या व्हिडीओला अवघ्या काही दिवसांत कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. साईराज सगळ्यांचा लाडका बनला आहे. आता साईराजचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे.
आज बचपन स्कूलमध्ये चिमुकल्यांच्या खास भेटीसाठी व गणेशोत्सवातील आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच फेमस रील स्टार साईराज केंद्रे यास बचपन क्युरीयस किड्स शाळेत पुढील वर्षी मोफत एडमिशन दिल्या जाईल अशी माहिती शाळेच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती यांनी दिली आहे
राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांनी पुढील यशस्वी कारकीर्दस शुभेच्छा दिल्या आहे
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यां सोबत आमच्या पप्पांनी गणपती आणला हे भक्ती गीत गात नृत्यही केले. तसेच यावेळी बचपन प्ले स्कूलमध्ये असलेल्या प्रत्येक खेळणी खेळून आनंद घेतला हे यावेळी खास आकर्षण ठरले.

