मुंबई/ दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटन वाढावे यासाठी दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ जगभरात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा जगभरात पोहोचावी यादृष्टीने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटनस्थळी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे, याबाबत व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 26, बुधवार दि. 27 आणि गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
🔷 रेल्वे दुहेरीकरण
◾ परभणी-गंगाखेड-परळी रेल्वे दुहेरीकरण मार्ग बदलास मंजुरी
परभणी /गंगाखेड : शहरातील गंगाखेड परळी वैजनाथ जाणारा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम होत असून पूर्वी हा...
धार्मिक, सामाजिक
बीड- परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)- श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी (दि.०८) रोजी सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने...
◾आरोपी डॉक्टरला अटक करण्यासाठी परळी शहर कडकडीत बंद
बीड परळी वैजनाथ-शहरातील डॉक्टरांने एका युवतीवर विनयभंग केल्याची घटना घडली असून डॉक्टरवर विनयभंगासह अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल करण्यात...
२१५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
बीड- (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण...