फोटो विकिपीडिया
🔷 मनोरंजन/ चित्रपट/ बॉलीवूड
🔸Waheeda Rehman- ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
🔷 माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ही घोषणा केली आहे. अनुराग ठाकूर यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या माध्यमातून त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली आहे.
◾ ट्विट- “वहीदा रेहमान यांना भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे. वहीदा रेहमान यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे.त्यांनी साकारलेल्या , कागज के फूल, प्यासा, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, खामोशी आणि इतर अनेक चित्रपट आहेत. 5 दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहीदा जी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे.”
“मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो जे चित्रपटाच्या इतिहासाचा एक अंगभूत भाग आहे.” असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
वहीदा रहमान यांची चित्रपट कारकीर्द ची सुरुवात डान्सर म्हणून तामिळ चित्रपट अलिबाबावम 40 थिरुदरगलम या पासून झाली.एक फूल चार काँटे, चाँदनी,बिस साल बाद या चित्रपटां मधील भूमिकेच विशेष कौतुक झाले.