पुढच्या वर्षी लवकर या !: राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण

छायाचित्र  तारकर्ली बीच

सिंधुदुर्ग/ मालवण-एम एन सी न्यूज नेटवर्क-  राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला राज्यातील काही ठिकाणी झालेल्या घटनेत काहींना आपले प्राण गमवावे लागले सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीतील काही ठिकाणी हलक्या त्या रिमझिम पावसाचा सरीत बाप्पांना निरोप देण्यात आला. यामध्ये घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचाही समावेश होता

पुढच्या वर्षी लवकर या !: राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; वाजतगाजत, ढोल-ताशांच्या तालावर रात्री उशीरापर्यंत मुंबईत मिरवणुकीत जल्लोष करत बाप्पांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी होती. पुण्यात पावसाच्या जोरदार सरीत विसर्जन मिरवणुकीत जल्लोष करत विसर्जन मिरवणुक चालू होत्या.

एकूणच भावपूर्ण निरोपात काही ठिकाणी दुःखद घटना घडल्या त्यामध्ये नाशिक मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान विविध ठिकाणी घडलेल्या घटनेत पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. पुणे येथील विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या शहरातून बाहेर पडणाऱ्या अनेक प्रवासी नागरिकांना उशिरापर्यंत रस्त्यावर राहावे लागले.