रु.2000 च्या नोटा 7 ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार, भारतीय रिझर्व बँकेचे नवीन परिपत्रक

🔷 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 3 हजार 56 अब्ज रुपय मूल्याच्या नोटा बँकांमध्ये परत.

नवी दिल्ली– भारतीय रिजर्व बँक म्हणजेच RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बँकेत भरणा करण्याबाबतची जमा करण्याची किंवा इतर नोटांसोबत बदलण्याची तारीख आता 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. आरबीआयने सांगितले की, ‘पैसे काढण्याच्या प्रक्रियेचा निर्धारित कालावधी संपला आहे. पुनरावलोकनाच्या आधारावर, 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची विद्यमान प्रणाली 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयने 19 मे 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही 2000 रुपयांची नोट कायदेशीर राहील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

हा रिझर्व्ह बँकेचा 19 मे 2023 रोजीचा आदेश आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून किंवा बँकांमध्ये जमा करता येतील, असे सांगण्यात आले. 2000 ची नोट 2016 मध्ये आली होती