भरधाव ट्रक रस्त्या लगतच्या झोपडीत घुसल्याने झोपेत असलेले सात मजूर चिरडले, तीन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

🔷 मजूर मेळघाटातील असल्याची माहिती आज सोमवारी पहाटे साडेपाच सुमारास घडली घटना,
    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर घडली घटना.

अमरावती: आज सोमवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास भरधाव ट्रक रस्त्या लगतच्या झोपडीत घुसल्याने झोपेत असलेले सात मजूर चिरडलेचा धक्कादायक प्रकार बुलढाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चिखलदरा तालुक्यातील मोरगाव येथील दहा मजूर नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू होते. महामार्गालगत झोपडीत झोपले असताना आज पहाटेच्या साडेपाच च्या सुमारास PB-11/CZ 4047 या आयशर वाहन भरधाव मजुरांच्या झोपडीत भरधाव गाडी घुसल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले.जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.पोलीस अधिक तपास करत आहेत