मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण विषयी संवाद दौरा सुरू, 3 ऑक्टोबर रोजी परळी वैजनाथ

🔷 13 जिल्ह्यातील 87 गावात साधणार संवाद

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-:-मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण विषयी संवाद दौरा सुरू असून त्यानिमित्त मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सिरसाळा येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेथील सभा आटोपून ते परळी येथे दुपारी 2 वाजता मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाची चळवळ बुलंद करणारे आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील हे परळी शहर व तालुक्यात तमाम मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.  मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

🔷 सिरसाळा येथे होणार महासभा 🔷

परळी तालुक्यातील मौजे सिरसाळा येथे मनोज जरांगे पाटील हे तमाम मराठा बहुजन बांधवांशी संवाद साधणार आहेत शिरसाळा येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला सरसगट कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा ठिकठिकाणी जाऊन समाज बांधवांशी संवाद साधत आहेत. दि. 3 ऑक्टोबर 2023 मंगळवार रोजी 11 वाजता सिरसाळा येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.मराठा आरक्षणासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिल्यावर 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे, 14 ऑक्टोबरला जालना येथील अंतरवाली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे

संपूर्ण मराठवड्यासह, नगर, नाशिक, सोलापूर, बुलढाणा यवतमाळ आदी जिल्ह्यांचा जरांगे दौरा करणार आहे. 11 ऑक्टोबर दरम्यान हा दौरा असणार आहे. या 12 ‎दिवसांच्या दौऱ्यात 13 ‎जिल्ह्यांतील 87 गावांमध्ये जाऊन‎ जरांगे पाटील मराठा संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 5 हजार किमीहून‎ अधिक प्रवास ते करणार आहेत. तसेच या दौऱ्यात जरांगे यांच्यासोबत कायम 200 कार्यकर्ते आणि 25 वाहनांचा ताफा असणार आहे.दरम्यान, 14 ऑक्टोबरला जरांगे जालना येथील अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा घेणार आहे. त्यापूर्वी मराठा समाजाला शांततेच आवाहन करण्यासाठी जरांगे आजपासून राज्याचा दौरा करणार आहे.