सोलापूर येथील  तीन सख्खे भाऊ धनुर्विद्या स्पर्धेत विजयी

सोलापूर /एम एन सी न्यूज नेटवर्क– येथील सिंचन भवन येथे लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले  निलेश शिवलिंग साखरे व सौ. गौरी  साखरे ह्या दामप्त्याच्या तिन्ही मुलांनी शहरस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत विविध गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजय मिळवला. 14 वर्षा खालील इंडियन राऊंड शहरी गटात नयन द्वितीय क्रमांक व नमन याने तृतीय क्रमांकाने विजय मिळविला तर सिद्धार्थ साखरे याने १७ वर्षाखालील recurve शहरी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिन्ही बंधूंनी विविध गटात प्रथम, द्वितीय अन् तृतीय क्रमांक मिळविणे ही अत्यंत कौतकास्पद असून विशेष बाब म्हणजे ह्या तिघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हल्ली खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष होत असताना समाजातील एकाच घरातील तीन सख्ख्या भावंडांनी धनुर्विद्या स्पर्धेत विजय मिळवित चॅम्पियन्स ठरल्याने साखरे बंधू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमन व नयन साखरे सध्या इयत्ता 6 वी (CBSE) इंडियन मॉडेल स्कूल या शाळेत शिक्षण घेत आहेत. सिद्धार्थ साखरे इयत्ता 10 वी स्टेट बोर्ड हा व्ही. एम. मेहता या शाळेत शिकत आहे.