🔷 परळीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करु तसेच परळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना आर्चरीचे प्रशिक्षणासाठी ॲकॅडमी सुरु करणार – बाजीराव धर्माधिकारी
बीड/परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क-
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन दिवसांपासून वैद्यनाथ नगरीमध्ये राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप आणि तिसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या स्पर्धेचे पदकवितरण” जि.प.गटनेते अजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. खेळामध्ये सर्वांना एकत्रित आणण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन अजय मुंडे यांनी केले.तर परळीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करु तसेच परळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना आर्चरीचे प्रशिक्षणासाठी ॲकॅडमी सुरु करणार असल्याचे स्वागताध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले.
३० सप्टेंबर रोजी राज्याचे क्रीडा मंत्री ना.संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष येवून आणि राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन द्वारा या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन केले होते.दि.२ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा समारोप झाला. तीन दिवसात अनुक्रमे “इंडीयन राऊंड”,”रिकर्व्ह राऊंड” आणि “कंपाऊंड राऊंड” या तीन आर्चरी खेळ प्रकरासाठी राज्यभरातून आर्चरी मधील दिग्गज खेळाडू परळी नगरीमध्ये आले आणि आपल्या खेळाचे प्रदर्शन आणि तिरंदाजीचा थरार दाखविला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते,ऑलंपिकमध्ये देशाचे नेतृत्व करणारे तसेच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी खेळत असणाऱ्या अनेक दिग्गजांची मांदियाळी या मैदानावर बघण्यास मिळाली.अनेक खेळाडू हे प्रशासकीय सेवेत पोलिस खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी देखील होते.सर्वांनीच या भव्य सुनियोजित आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.
स्वागताध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन,बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन,परळी तालुका क्रीडा शिक्षक संगटना,फाऊंडेशन स्कूल,पत्रकार बांधव,परळी मधील सजग क्रीडाप्रेमी पालक व प्रेक्षक,आर्य समाजचे श्रद्धानंद गुरुकुल मधील चिमुकले,दयानंद व्यायाम शाळा मधील विद्यार्थी यांचे व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यास अजय मुंडे,वैजनाथ सोळंके, अभयकुमार ठक्कर, राजाभैय्या पांडे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, तुळशीरामजी पवार, डॉ.पी. एल.कराड जयपाल लाहोटी,अब्दुल करीम,वैजनाथ कळसकर,ॲड. प्रदीप गिराम, ऋषिकेश लोमटे, रविंद्र परदेशी,राजेंद्र सोनी, विष्णूपंत कुलकर्णी, प्रा.शशिकांत जोशी, दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल आष्टेकर, रमेश चौंडे,रमेश अण्णा भोयटे,डॉ.अंकुश जबदे ॲड.मनजीत सूगरे, अजय सोळंके,अमर राजेसाहेब देशमुख,बापू ईटके,सुभाषजी भिंगोरे, पैंजणे सर,नितीन शिंदे,ज्ञानेश मातेकर, संजय कुकडे, संजय देवकर, लालाखान पठाण,के.डी. उपाडे, ॲड.महारुद्र कराड, ॲड.शेख शफीक, पी.टी.मुंडे सर,प्रा. शामसुंदर दासुद,प्रा.राहुल जगतकर,रमेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे राज्य कोषाध्यक्ष रंगराव साळुंखे सर,सहसचिव सोनल बुंदेले तसेच बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन चे सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी, प्रविण गडदे सचिव धाराशिव,अशोक जंगमे सचिव लातूर,अभिजीत दळवी सचिव अहमद नगर,अनिल थडकर सचिव वाशिम,आशिष शिंदे पिंपरी चिंचवड, गिरीश कुकडे मुख्य पंच,कैलास लाडंगे मैदान प्रमुख,आशुतोष खिची पंच, संभाजीनगर, नितेश भांगुलकर पंच, अमरावती,दीपक सुरडकर पंच, संभाजीनगर,प्रज्योत कावरे पंच,अक्षय टेकाडे पंच अमरावती,गणेश गिरमकर,पंच अरविंद कोळी पंच सोलापूर, बाबाराव नरवडे पंच हिंगोली यांचा परळी नगरी मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचे ठरविले यासाठी विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बीड जिल्हा आर्चरी असोसिएशन व परळी तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्र संचलन विलास आरगडे यांनी तर निकाल वाचन सोनल बुंदेले यांनी केले.