🔷 बंसल क्लासेस व क्यूरीयस किड्स आयोजित शैक्षणिक गुंतवणूक परिषदेस व्यावसायीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
कोल्हापूर/एम एन सी न्यूज नेटवर्क : राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्सद्वारे शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ‘एज्यूकेशनल इन्व्हेस्टर्स समीट-2023’ हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर शहरात झालेल्या ‘एज्यूकेशनल इन्व्हेस्टर्स समीट-2023’ म्हणजेच ‘शैक्षणिक गुंतवणूक परिषदेला’ विविध क्षेत्रातील उद्योजक व भावी व्यावसायीकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील व्यावसायीकांना शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बंसल क्लासेसचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी सर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ‘शैक्षणिक गुंतवणूक परिषद’ दि. 1 ऑक्टोबर, रविवार रोजी हॉटेल वूडलॅंड, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली. या कार्यक्रमाला शिक्षणतज्ञ तथा व्याख्याता नीलिमा देशपांडे मॅडम, लोकमत वृत्तपत्राचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख सर, दिपक मनाठकर, बंसल क्लासेस प्रा.लि.चे मानव संसाधन विभागाचे प्रमुख स्पर्श द्विवेदी सर, आर.पी.एस. सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शैक्षणिक व्यावसायिक गुंतवणूक परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांनाबंसल क्लासेसचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी सर म्हणाले की, व्यवसाय करण्यासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत आणि स्पर्धाही आहे. ज्या क्षेत्रामध्ये स्पर्धा असतात त्या सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेची सेवा मिळते. परंतू दुर्देवाने शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध नाहीत आणि स्पर्धाही नाही. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले गाव, शहर सोडून इतर ठिकाणी जावे लागते आणि त्या ठिकाणी देखील मिळणारी शैक्षणिक सेवा तितकीशी प्रभावी नसते. त्यामुळे व्यावसायीकांनी शिक्षण क्षेत्राकडे वळाले पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक भावी व्यावसायीकांना, उद्योजकांना आपण शैक्षणिक क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बंसल क्लासेस व फिनलँड पॅटर्नवर आधारीत क्यूरियस किड्सद्वारे संधी तर देणार आहोतच, पण सोबत व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे मदत देखील करणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्य प्रवर्तक बियाणी यांनी दिले.
या शैक्षणिक गुंतवणूक परिषदेला बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी सर, उपाध्यक्ष कैलास घुगे सर, उपाध्यक्षा पुजा बियाणी मॅडम, बंसल क्लासेस महाराष्ट्र स्टेट हेड प्रा. विष्णू घुगे सर, बंसल क्लासेसचे चिफ ॲडमिनिस्ट्रेटर राकेश चांडक सर, फायनान्स हेड सुरज बियाणी सर, व्हाईस स्टेट हेड एस.एस.कादरी सर, व्हाईस स्टेट हेड सत्यजीत हैबते सर, गार्डिअन मॅनेजर सुरेश घुगे सर, सेल्स हेड नामदेव कराड सर, बी.पी. सिंग सर, बंसल क्लासेस नागपूर डिव्हीजनल हेड पी.बी. कळकेकर, पुणे डिव्हीजनल हेड संतोष जायभाय, पुणे डिव्हीजनल कॉर्डिनेटर संध्या पांडे मॅडम , क्युरीयस किड्सच्या किरण रोडा यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उद्योजक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.