परळी नगरपालिकेने पत्रकारांना दिलेल्या आश्वासनाचा विसर,सामान्य जनतेचे काय-ॲड.मनोज संकाये

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी नगरपालिकेने पाच वर्षापुर्वी परळी शहरातील पत्रकारांना घरासाठी जागा देण्याचा ठराव घेतला.परंतु सदरील जागा आत्तापर्यंत हस्तांतरीत झालेली नाही.समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांबाबत परळी न.प.ची ही भुमिका असेल तर सामान्य जनतेच्या समस्यांचे काय? असा सवाल सामाजीक कार्यकर्ते ॲड.मनोज संकाये यांनी केला आहे.

परळी नगरपालिकेने मागील पाच वर्षात अनेक संस्था,समाजघटकांना केवळ आश्वासने दिली आहेत.परळी शहरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी नंदागौळ मार्गावरील जुना कचरा डेपोची जागा देण्याचा ठराव पारित केलेला व या जागेवर मान्यवर नेत्यांच्या हस्ते नामफलक अनावरण करण्यात आल्यानंतरही ही जागा पत्रकारांसाठी अद्याप मोकळी करुन दिलेली नाही.याच काळात राजकिय पक्षांच्या नेते,कार्यकर्ते यांना दिलेल्या जागा तात्काळ ताब्यात दिल्या आहेत.समाजाचे प्रश्न मांडणारे,राजकिय नेत्यांना प्रसिध्दी देणारे पत्रकारांबाबत असे घडत असेल तर सामान्य जनतेच्या समस्यांचे काय ?असा प्रश्न ॲड.मनोज संकाये यांनी करत नगरपालिकेच्या कर्त्याधर्त्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.