दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे 7 व 8 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रिडा तसेच इतर सर्वांगिण विकासाचे माहेरघरच. दरवर्षी तालुका/ जिल्हास्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन शाळेमध्ये केले जाते. विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनात दि.7 व 8 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय बास्केटबॅाल स्पर्धेत विविध तालूक्यातून ३९ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हाक्रीडा यावर्षीच्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी शाळेला प्राप्त झालेली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठीची सर्व तयारी जिल्हा क्रीडा अधिकारी देशमुख मॅडम, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कनाके सर, दिल्ली वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे सर, क्रीडा शिक्षक संजय देशमुख सर आदि करत आहेत.

बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ऑक्टोबर 2023 ते 8 ऑक्टोबर २०२३ वार शनिवार, रविवार या दिवशी करण्यात आले आहे. परळी परिसरातील जास्तीत जास्त शाळांनी व क्रीडा प्रेमींनी जिल्हास्तरिय स्पर्धांचा आनंद व लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.